Wednesday, 29 September 2021

ब्लॅक फॉरेस्ट ट्रिप २०२१

 ब्लॅक फॉरेस्ट ट्रिप २०२१


सप्टेंबर २०२१ मध्ये ब्लॅक फॉरेस्ट ट्रिप ला जायचे नक्की केले. जर्मनीमध्ये ८ वर्ष झाली तरी ते बघणे झाले नव्हते. मुले आता जरा मोठी झाली आहेत म्हणजे ७ आणि ३ वर्षे, त्यामुळे ट्रिपला जाणे सोपे झाले आहे. 

राहण्यासाठी titisee नावाचा लेक आहे त्याजवळ असणारे युथ हॉस्टेल बुक केले. आम्हाला ६ रात्री मिळाल्या होत्या म्हणजे भरपूर वेळ होता फिरायला. ३० ऑगस्ट ला सकाळी निघालो. ३०० किलोमीटर प्रवास होता. निघताना पाऊस होता त्यामुळे हवा गार होती. मध्ये २ वेळा थांबून संध्याकाळी ४ ला पोचलो. आमची रूम एकदम वर होती. तिथे ६ बंक बेड होते. मुलांना रूम खूप आवडली. हे युथ हॉस्टेल म्हणजे  १०० वर्ष जुने शेतकऱ्याचे घर होते. पण व्यवस्थित ठेवले होते. रात्री जेवून लौकर झोपलो. तिथे रोज सकाळी ब्रेकफास्ट मिळतो, त्यात वेगवेगळे ब्रेड, बटर, जॅम, दही, फळे, दूध, कॉफी, मुसली असे बरेच प्रकार असतात.

३१ ऑगस्टला ब्लॅक फॉरेस्ट ओपन एअर म्युझियम बघायला गेलो. तिथे पूर्वीच्या काळातील शेतकऱ्यांची घरे, सामान बघायला ठेवले आहे. मुलांना ते खूप आवडले. तिथे फिरून मग अतिशय प्रसिद्ध अशा ब्लॅक फॉरेस्ट केकचा आस्वाद घेतला. संध्याकाळ चे जेवण पण युथ हॉस्टेल ला घेण्याचे ठरवले. ते ६ ला सुरु होते म्हणून लौकर परत आलो. टिपिकल जर्मन जेवण म्हणजे मुख्य पदार्थ बटाटे, बाकी सॅलड, सौस, आणि शेवटी डेझर्ट होते. मुलानं असे जेवण खूप आवडते त्यामुळे सगळे पोटभर जेवलो.  

१ सप्टेंबर ला Ravenna नदी आणि जंगल बघायला गेलो. तिथे एक मोठ्या घराचे cuckoo क्लॉक बनवले होते. जंगलामधून ४ किलोमीटर आता जायचे आणि परत यायचे.  जाताना डोंगर चढाव होता व एका बाजूला नदी चा धबधबा होता. पूर्ण पाइनचे जंगल होते. ४ किलोमीटर चढून एका डोंगरावर पोचलो. मग तिथे खाऊन परत यायला निघालो. संध्याकाळी titisee लेक च्या काठावर मुले पाण्यात खेळली. 

२ सप्टेंबर ला एक nature experience पार्क बघायला गेलो. तिथे खूप खारी होत्या. झाडाचा टेलिफोन, झाडे आणि प्राणी यांची वेगवेगळी माहिती, आणि खेळायला मोठी जागा होती.    

३ सप्टेंबर ला titisee लेक  मध्ये पेडल बोट घेतली आणि १ तास बोटींग केले. मुलांनी पण पेडल चालवले, खूप मजा आली. नंतर एका giant व्हील मध्ये बसलो. तिथे एक ट्रेन होती ती १ तास जंगले आणि डोंगरावर फिरवून आणते त्यात पण बसलो. 

४ सप्टेंबर ला एक धबधबा बघायला गेलो. आज परत ८ किलोमीटर चालणे झाले. येताना जोरात पाऊस आला आणि पूर्ण भिजलो. 

५ सप्टेंबर ला चेक आऊट करून घरी यायला निघालो. दुपारी ३ ला घरी पोचलो. अशा प्रकारे ब्लॅक फॉरेस्ट ट्रिप खूपच छान झाली. तिथली आठवण म्हणून एक लाकडी घड्याळ आणले.