Showing posts with label anant. Show all posts
Showing posts with label anant. Show all posts

Wednesday, 4 May 2016

अनंत चे बालपण

अनंत चे बालपण 

अनंत चे पहिले वर्ष तसे हळू हळू गेले. मात्र दुसरे वर्ष इतके पटकन गेले कि कळलेच नाही. तो सहा महिन्यांचा झाल्यावर त्याला मी मुग मसूर उडीद डाळ आणि तांदूळ खिमट देऊ लागले. आधी तांदूळ डाळी धुवून सुकवायचे. मग लाल रंग येईपर्यंत २० मिनिटे भाजायचे मग mixer वर बारीक पूड करायचे. करताना पूड पाणी मीठ हिंग हळद तूप खारीक पावडर शिजवायचे. त्यात पालक paste, बीट घालायचे. मग उकडलेला भोपळा रताळे गाजर देऊ लागले. सातूचे पीठ मुग लाडू पण आवडीने खात असे. मग दुध पोळी उसळ उपमा रवा खीर शिरा देऊ लागले. इडली सांबार, रताळे कीस, नाचणी खीर पण आवडत असे त्याला. कधी अंडे भुर्जी आम्लेट देत असे. दोन वर्षांचा झाल्यावर मऊ मुग मसूर खिचडी देऊ लागले. त्यात बटाटा ब्रोकोली पालक गाजर मटार सोया घालत असे.

अनंत जसा एक वर्षाचा झाला त्याने बोलायला सुरवात केली. त्याचे पहिले शब्द होते आम माम बाम. मग हळूहळू आई बाबा म्हणू लागला. मग पापा, मम, नाहू नाहू, बा बदक, चिऊ, काऊ, मोई मोर, घू  घुबड, कोची कोकिळा, गाऊ गाढव, बू बेडूक, आजीम अंजीर, शाबान सांबार, गाजी गाजर, आका अक्रोड, णाये दाणे, दाऊ लाडू, दाऊ कुट दाण्याचा लाडू, पुई पोळी, आटी आमटी, कोचीमाम कोशिंबीर, मोगू काडेपेटी, चांद चंद्र,  इमान विमान, छुई सूर्य, फुई फूल असे बोलायचा.

जेंव्हा कूकर ला प्रेशर यायचे आणि तो हलायचा तेंव्हा अनंत म्हणायचा कुकू नाच.अशी गोड भाषा होती त्याची. अनंत जर्मनी मध्ये playgroup ला जात असे. तिथे सास्किया नावाची teacher होती. अनंत सारखे तिचे नाव घेत असे. ती खूप गोड होती म्हणून त्याला आवडत असेल. घराजवळ एक कनाल होता त्यात बदके असत. अनंत बदकाच्या मागे पळत असे. एकदा अनंत च्या playgroup मध्ये मेंढी आणि तिची बाळे आणली होती किती मज्जा..