Wednesday, 4 May 2016

जर्मनी मधील अनुभव


मी लग्न होऊन पहिल्यांदा जर्मनी मध्ये आले ते २० मे २०१३ ला. विमान land होताना हिरव्या शेतांचे तुकडे, छोटी घरे, नदी खूप सुंदर दिसत होते. पहिली प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे इथली शांतता. थोडा आराम करून आम्ही संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो. ते उन्हाळ्याचे दिवस होते. सगळीकडे हिरवाई पसरली होती. munich सारख्या मोठ्या शहरात सुद्धा भरपूर झाडे नदी पक्षी होते. 

सहा महिन्यांनी आम्ही augsburg या छोट्या गावात राहायला गेलो. नवीन घरात दिवे फिट करण्यापासून सगळे स्वतालाच करावे लागले. सामान हलवून झाले. नवीन घर फारच सुंदर होते. मोठ्या खिडक्या भरपूर उजेड. बाल्कनी तून निरभ्र रात्री दिसणारा चंद्र चांदण्या हवाहवासा गारवा हे अनुभव फार अप्रतिम होते. जो कोणी घरी येत असे त्याला आमचे घर खूप आवडत असे. आम्ही बाल्कनी मध्ये सुंदर बाग बनवली. 

तिथला निसर्ग तर वेड लावणारा होता. switzerland च्या तोडीचा निसर्ग इथे आहे कारण हा बायेर्न बेल्ट नावाचा एकच प्रदेश आहे. तेंव्हा मी प्रेग्नंट होते. त्यावर्षी थंडी विशेष नव्हती. बर्फ पण एकदाच पडला. तो पहिला snowfall  रात्री झाला. सगळी घरे रस्ते झाडे पांढरी शुभ्र बर्फाची चादर लेवून बसले होते. 

february महिना संपला आणि स्प्रिंग सुरु झाला. मी रोज घराजवळ नदी होती तिथे फिरायला जात असे. इथले वैशिष्ट म्हणजे वर्षाचे चारही ऋतू ठळकपणे वेगळे अनुभवयला मिळतात. भारतात ऋतुंमध्ये एवढे वेगळेपण नसते. सर्वप्रथम गवतावर जांभळी रानफुले उगवू लागली. मग ती नाहीशी होऊन पांढरी पिवळी फुले आली.









झाडांना कोवळी पालवी फुटली. इथे गुलाबी आणि पांढऱ्या चाफ्याची खूप झाडे होती. ती पूर्ण फुलांनी भरून गेली होती. मार्च सुरु झाला आणि daffodils येऊ लागली त्यामागून tulips. . इथे छोटे बंगले आणि त्याभोवती खूप सुंदर बागा असत. बागेत daffodils tulips गुलाब लावलेले असत. 

जून जुलै ऑगस्ट म्हणजे इथला उन्हाळा. जागोजागी गुलाब एकेक झाडावर पन्नास पन्नास पिवळे लाल गुलाबी गुलाब. सुख म्हणजे अजून काय असतं? 





september आला आणि हवेत गारवा वाढू लागला. ऑक्टोबर सुरु झाल्यावर पानगळ सुरु झाली. पुन्हा झाडे लाल पिवळ्या केशरी रंगात माखून निघाली. मात्र यावेळी हे पानाचे रंग होते. 







नोव्हेंबर महिनाभर ही रंगपंचमी सुरु राहिली. डिसेंबर आला तशी पाने पडून गेली आणि फक्त झाडांच्या फांद्या राहिल्या. मग बर्फ पडू लागला. पांढऱ्या बर्फाच्या चादरी मुळे सगळे झाकून गेले. 








जानेवारी मध्ये एक दिवस -१२ temperature होते. मी अनंत ला playgroup  मध्ये सोडायला गेले होते. चेहऱ्याची थंडीमुळे आग होत होती. 

पुन्हा फेब्रुवारी संपला. गवतावर जांभळी फुले उगवू लागली आणि एक ऋतुचक्र पूर्ण झाले. 






No comments:

Post a Comment