Thursday, 8 October 2020

आद्याचे बाळपण

 







                                                                      

आद्या लहानपणी खूप गोड हसायची. अजूनही ती मनापासून गोड हसते. आद्या जास्त बोबडे बोलत नसे. पण काही शब्द फार गोड बोलायची. कंगवाला कंवा, पेंग्विनला पिंगूळ, कावळ्याला कावडा, फुलपाखरूला फुकाबाबा, पेन्सिलला पिशीन म्हणायची आणि सारख्या पाप्या द्यायची. तिला आई चे केस विंचरणे, क्लिप लावणे, आईला भरवणे, झोपताना पांघरूण घालणे फार आवडे. ओंकार तिला मुमू म्हणायचा आणि मी गुड्डू. 
तिचा आवाज फार गोड आहे. ती फोनवर बोलताना तर आवाज अजूनच गोड वाटतो. मी कधी नवीन कपडे किंवा दागिने घातले कि लगेच तिच्या लक्षात यायचे आणि ती म्हणायची किती छान आहे. मी नेलपॉलिश लावले कि लगेच तिला पण हवे असायचे. 


No comments:

Post a Comment