Monday, 12 April 2021

कोरोना चे दिवस

                                        

कोरोना ची महासाथ सुरु होऊन पाहता पाहता एक वर्ष उलटले. मार्च २०२० पासून आता एप्रिल २०२१ आला. आता पूर्वीचे दिवस आठवतच नाहीत इतकी सवय झाली आहे कोरोनाची. बाहेर पडताना मास्क लावा, कोणाच्या घरी जाणे येणे नाही, कुठले कार्यक्रम नाहीत आणि प्रवासही नाही. 

मुलांच्या शाळा बंद. घरी विडिओ पाहून अभ्यास करणे. हवा चांगली असेल तर बाहेर जाणे. हवा खराब असेल तर घरातच. त्यातून आता मुलांना शाळेत corona टेस्ट ची सक्ती. बहुतेक हे वर्षही असेच जाणार मागील वर्षासारखे. 

यावर्षी आद्याच्या वाढदिवसाला मँगो केक केला. सुंदर दिसत होता. आता अनंत च्या वाढदिवसाला earth केक करीन. 








No comments:

Post a Comment