Sunday, 30 January 2022

Oberammergau ट्रिप जानेवारी २०२२

आम्ही ८ वर्ष जर्मनी मध्ये राहिलो तरी विंटर मध्ये कधी जर्मनीत ट्रिप केली नव्हती. त्यामुळे यावर्षी oberammergau या आल्प्स मधील एका छोट्या गावात जायचे ठरवले. नेहमीप्रमाणे युथ हॉस्टेल बुक केले होते, कारण तिथले जेवण, खोल्या सर्वाना आवडतात. ३ जानेवारी ला संध्याकाळी निघालो. हे ठिकाण आमच्या गावापासून २०० किमी आहे, त्यामुळे २ तासात पोचलो. रात्री जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी चक्क १० डिग्री होते त्यामुळे नदीकाठी लांब चालायला गेलो. आम्हाला वाटले एवढे आलो आहोत आणि बर्फ मिळणार की नाही. पण बुधवारपासून भरपूर snowfall सुरु झाला. अनंत तिथे स्कीईंग चा कोर्स करणार होता. त्याचा ३ दिवस कोर्स होता. ३ दिवसात तो स्कीईंग शिकला. मग चौथ्या दिवशी रोपवे नी एका डोंगरावर जायचे ठरवले. आद्या झोपली होती आणि ओंकारला फारसा इंटरेस्ट नव्हता. म्हणून मी आणि अनंत गेलो. वर भयंकर थंडी आणि वारा होता. मायनस मध्ये temperature असावे. पण वरून दिसणारा view  इतका अप्रतिम होता की तिथून निघावेसेच वाटत नव्हते. भरपूर फोटो काढले, हॉट चॉकोलेट प्यायले आणि शेवटी निघालो. 

एक दिवस snow मध्ये नदीकाठी २ तास फिरायला गेलो. आद्य आणि अनंत sledge वर बसले होते. सगळीकडे बर्फच बर्फ. खरंच ती व्हाईट ब्युटी होती. 

शेवटच्या दिवशी आल्प्स मध्ये एक eibsee नावाचा लेक आहे. त्याभोवती पूर्ण राउंड ५ किमी होते. ती करायचे ठरवले. तिथेच मागे zugspitz हे शिखर आहे. पूर्ण मार्गावर बर्फ होता. लेकचे वेगवेगळे दर्शन होत होते. दुपारी ऊन आले आणि आल्प्स मधील शिखरांचा अप्रतिम नजारा दिसू लागला. आता बर्फ घट्ट होऊन ice झाला होता. त्यामुळे पाय घसरून पडायला होत होते. शेवटी पूर्ण राऊंड करून दमून घरी आलो. थंडीमुळे आणि बर्फामुळे ५ किमी पण खूप अंतर वाटले. 

अशाप्रकारे विंटर मधील सुंदर ट्रिप करून ७ दिवसांनी घरी आलो.

No comments:

Post a Comment