Tuesday, 29 March 2022

स्पेन २०२२
























कधीपासून बीच वर जायचे मनात होते म्हणून स्पेनला जायचे ठरवले. मालोर्का नावाचे एक बेट आहे तिथे जायचे ठरवले. आधी ऑग्सबुर्ग ते फ्रॅन्कफुर्ट ट्रेनने गेलो. मग फ्रॅन्कफुर्ट ते पाल्मा अशी २ तास फ्लाईट होती . 


आमचे हॉटेल बीच वरच होते, आणि रूम च्या बाल्कनी मधून समुद्र दिसत होता. किचन असल्यामुळे जेवण घरीच करता येत होते. खूपच सुंदर हवा होती. मुलांनी बीच वर खूप शिंपले गोळा केले. हॉटेल वर मिनी डिस्को होता तिथे मुलांना डान्स करायला मजा आली. 


दुसऱ्या दिवशी पाल्मा aqarium बघायला गेलो. ते खूप मोठे होते. ८००० मासे होते. शार्क पण होते. मुलांना खूप मजा आली. तिसऱ्या दिवशी संत्र्याची बाग बघायला गेलो. मार्च महिना असल्यामुळे संत्री व लिंबू पिकले होते. झाडे फळांनी नुसती लगडली होती. अंजीर, ग्रेपफ्रूट, अवकॅडो ही पण झाडे होती. तिथे फ्रेश संत्री, orange juice आणि छोटे स्नॅक मिळाले. ते खूप चवदार होते. तिथे कोंबड्या व मोर होते. मुलांनी त्यांना खायला घातले. मुलांना खूप मजा आली. 


येताना आठवण म्हणून फ्रिज मॅग्नेट आणले. पुन्हा फ्रॅन्कफुर्टला येऊन ट्रेनने  ऑग्सबुर्गला घरी आलो. 

No comments:

Post a Comment