Tuesday, 24 September 2024

बंगलोर चे दिवस - हर्षा प्राईड


NAL कॉलनी मध्ये १ वर्ष राहिलो. पण ते घर जुने आणि छोटे होते. त्यामुळे आम्ही  दुसरे घर पाहायला सुरुवात केली. ६ महिने शोधाशोध करून शेवटी मुलांच्या शाळेजवळ कग्गादासपुरा या भागात एक घर मिळाले. नवीन घर खूप मोठे होते. ३ मोठ्या बेडरूम, २ बाल्कनी, हॉल, डायनिंग रूम, मोठे किचन असे प्रशस्त होते. हवा उजेड भरपूर होते. मुलांसाठी बॅडमिंटन कोर्ट, स्विमिंग पूल अशा अनेक सोयी होत्या. घर मी मनासारखे सजवले. मुलांची शाळा अगदी जवळ होती. त्यामुळे मी मुलांना स्कूटरवर सोडत आणि आणत होते. दुकाने पण जवळ होती. आम्हाला नवीन घर खूप आवडले. नवीन सोसायटी मध्ये दिवाळी, १५ ऑगस्ट सारखे सण एकत्र साजरे केले जात. जेवण, मुलांचे प्रोग्रॅम पण असत. 

No comments:

Post a Comment